छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडल. या शोच्या मंचावर अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे. ‘इंडियन आयडल’ या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. आता ‘इंडियन आयडल मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात परिक्षक म्हणून संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल दिसणार आहेत. तर शो चे सूत्रसंचालन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर करताना दिसणार आहे.

स्वानंदी अभिनय, गाणं आणि आता ‘इंडियन आयडल मराठी’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तिला या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. स्वानंदीने सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ या शोची विजेती ठरली होती. आता ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

‘इंडियन आयडल’ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेत. आता ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. इंडियन आयडल मराठी २२ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader