देशप्रेमाबरोबरचं देशभक्तांच्या मनात रूजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत आगामी चित्रपट ‘निळकंठ मास्तर’… मेघमाला बलभिम पठारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या तरूणाच्या आयुष्यात प्रेमाची लागलेली चाहूल… या सुंदर नात्याची चित्रपटातून उलगडत जाणारी घडी गजेंद्र अहिरेंनी उत्तम बसवली आहे.
चित्रपटाचा गाभा ओळखून त्या काळातलं संगीत देण्याचं शिवधनुष्य अजय-अतुल यांनी लिलया पेललं आहे. गजेंद्र अहिरेंची गीतरचना लाभलेल्या या चित्रपटासाठी हिंदी-मराठीतले बरेच दिग्गज एकत्र आले आहेत. चित्रपटात एकंदर पाच गाणी आहेत. देशप्रेमाची गाथा सांगणाऱ्या वंदे मातरम् या गाण्याला तब्बल अठरा गायकांनी आपला आवाज दिला आहे. तर प्रियकरासाठीची ओढ अधिरं मनं झाले या गाण्यातून व्यक्त होते. हिंदी गायकविश्वात आपलं नाणं चोख वाजवलेल्या श्रेया घोषाल हिनं अधिरं मनं या गाण्याला आपल्या गायनातून एक वेगळीचं उंची दिली आहे. देशप्रेमाने झपाटलेल्या आपल्या सख्याला साद घालणारं परतूनी येना हे गाणं…या गाण्यासाठी जावेद अली हे हिंदीतलं मोठं प्रस्थ आणि श्रेया घोषाल ही गोड गळ्याची गायिका मराठीत एकत्र आले आहेत. कौनसे देस चला या गाण्यातून देशासाठी झटणाऱ्या तरूणाईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. संगीतकार अजय गोगावले यांनी या गाण्याला आपला आवाज दिलाय तर श्रेया घोषाल हिने त्यांची सोबत केली आहे. चित्रपटाच्या गीतांबरोबरचं या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ही तितकचं मनाला भावतं. आनंदी जोशी आणि आदित्य मोडक या गायकांनी चित्रपटाच्या पार्श्वसंगीतातल्या ओळी गुणगुणल्या आहेत.
विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, प्रदिप वेलणकर, अमिता खोपकर, राहुल सोलापूरकर, मंगेश देसाई आणि इतर कलावंतही आहेत. अजय-अतुल यांचं संगीत दिग्दर्शन आणि गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन लाभलेला ‘निळकंठ मास्तर’ येत्या ७ ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
अजय-अतुलचा नवा अध्याय ‘निळकंठ मास्तर’
देशप्रेमाबरोबरचं देशभक्तांच्या मनात रूजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत आगामी चित्रपट
आणखी वाचा
First published on: 13-07-2015 at 02:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay atuls music to nilkanth master