‘सन ऑफ सरदार’चा निर्माता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या विरोधात दाखल केलेली याचिका ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय)ने मंगळवारी फेटाळली. सीसीआयच्या या निर्णयामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच अजय देवगणला मोठा धक्का बसला आहे. सीसीआयचा हा निर्णय धक्कादायक असून त्याला आव्हान देण्यात येणार असल्याचे अजय देवगण फिल्मस ( एडीएफ) ने सांगितले.
अजयचा ‘सन ऑफ सरदार’ आणि यशराज फिल्म्सचा ‘जब तक है जान’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. यशराज फिल्म्सने चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रभावाचा वापर करत ‘जब तक है जान’साठी अधिक खेळ आरक्षित करण्याचा वितरकांवर दबाव टाकला. यशराज फिल्म्सची ही कृती स्पर्धात्मक कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा अजय देवगणने सीसीआयकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता. यशराज फिम्स्च्या दांडगाईच्या धोरणामुळे आपल्या चित्रपटाला पुरेशी चित्रपटगृहे मिळाली नसल्याची तक्रार अजयने आपल्या याचिकेत केली होती.अजय देवगणला आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरेशी आकडेवारी सादर करण्यात अपयश आल्यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात आल्याचे सीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात स्पर्धात्मक कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाले नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
प्रकरण काय?
अजयचा ‘सन ऑफ सरदार’ आणि यशराज फिल्म्सचा ‘जब तक है जान’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. यशराज फिल्म्सने आपल्या प्रभावाचा वापर करत ‘जब तक है जान’साठी अधिक खेळ आरक्षित करण्याचा वितरकांवर दबाव टाकला, असा दावा अजय देवगणने केला आहे.
सीसीआयने फेटाळली अजय देवगणची याचिका
‘सन ऑफ सरदार’चा निर्माता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या विरोधात दाखल केलेली याचिका ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय)ने मंगळवारी फेटाळली. सीसीआयच्या या निर्णयामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच अजय देवगणला मोठा धक्का बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-11-2012 at 02:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan plea rejected