बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. गेल्या काही काळात तो देशवासीयांना करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्याचे विविध पर्याय सांगत आहे. यावेळी त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या एका औषधाची जाहिरात केली होती. मात्र यामुळे नेटकऱ्यांनी अजयला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तुझं ऐकून आम्ही विमल खायला सुरुवात केली असं म्हणत अजयची खिल्ली उडवली जात आहे.
अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Hi friends, I’ve been taking IMMU 10T for over a month now. It’s an effective immunity booster. It has really worked for me. If you are inclined to try it, it’s on @amazonIN #YouthSecrets
https://t.co/uJDnHVh6Ol— Ajay Devgn (@ajaydevgn) July 7, 2020
अवश्य पाहा – पावसाला थांबवण्यासाठी अभिनेत्री झाली ‘रेन पोलीस’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
“हेलो मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून मी IMMU 10T हे औषध घेत आहे. हे एक प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. या औषधाने माझ्यावर खूप चांगला प्रभाव टाकला. तुम्ही हे औषध अॅमेझॉन इंडियावरुन खरेदी करु शकता.” अशा आशयाचे ट्विट अजय देवगणने केले होते. मात्र या ट्विटमुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे गंमतीशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Aare sir aapka sunke Vimal try kiya tha…ab aadat chut nahi rahi
— Unfollow Me (@RadioGu25870316) July 7, 2020
Bolo Zuban Kesari!!! pic.twitter.com/g8k0bzBYJf
— Lampard (@Ritesh_Dreams) July 8, 2020
Sir vimal se bhi milta hai kya immunity ? pic.twitter.com/cpekBh7ZQ2
— ranjeet (@akkian_RT) July 7, 2020
I thought VIMAL is your immunity booster
— harish (@harishmysuru1) July 7, 2020
भारतात सलग सहाव्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची नोंद
भारतात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख ४ हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या २० हजार ६४२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या करोनाचे २ लाख ६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.