बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा चित्रपटविश्वातला बिग बजेट कलाकार आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूजः द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मैदान’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे, या चित्रपटात अजय खूप महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.

अजयने ट्वीटर अकाऊंटवर त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत “मैदान, एक अशी कथा जी प्रत्येक भारतीयाला आवडेल, एक असा चित्रपट ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ३ जून २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.”, अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. त्याने या ट्वीटसोबत चित्रपटाचे काही पोस्टर शेअर केले आहेत. यातील एका पोस्टरमध्ये अजयने ग्रे रंगाची पॅन्ट आणि निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तसंच तो पायाने फुटबॉल थांबवत असल्याचे या पोस्टरमध्ये पाहायला मिळते आहे.

‘मैदान’ या चित्रपटात अजय फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत प्रियामणी, गजराज राव, रुद्रनील घोष हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. अजय देवगणचा हा चित्रपट १५ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र कोविडमुळे याचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. आता २ जून रोजी हा चित्रपट प्रक्षाकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे अजयचे फॅन्स त्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

Story img Loader