बॉलीवूडच्या दुनियेत नव्यानेच दाखल झालेल्या कपिल शर्माला अभिनेता अजय देवगणने चक्क ‘लग्न करू नकोस,’ असा सल्ला दिला आहे. गेली १६ वर्षे काजोलसोबत सुखाचा संसार करणाऱ्या अजयने कपिलला असा सल्ला का द्यावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजय देवगणने शुक्रवारी ट्विटरवरून कपिलला हा सल्ला दिला असून त्यासोबत एक व्हिडिओही जोडला आहे. या व्हिडिओसोबत अजयने माझा सल्ला ऐक, @KapilSharmaK9 शादी मत कर, असा संदेश लिहला आहे. तू लग्न करत आहेस, असे मी ऐकले. पण, मित्रत्त्वाच्या नात्याने मी तुला एक सल्ला देतो, लग्न करू नकोस, असे अजयने या व्हिडिओत म्हटले आहे. विशेष म्हणजे अगदी एक-दोन दिवसांपूर्वीच शेरवानी परिधान केलेले कपिलचे छायाचित्र पाहून चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाविषयीची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता हे प्रकरण नक्की आहे तरी काय, याबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच दुखापत झाल्यामुळे कपिलने टेलिव्हिजनवरील त्याच्या ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या लोकप्रिय कार्यक्रमात काम करणे थांबविले होते. याशिवाय, थोड्याच दिवसांत दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांच्याबरोबर केलेला त्याचा ‘किस किससे प्यार करूँ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Take my advice @KapilSharmaK9 , shaadi mat kar. #KapilKiShaadi https://t.co/dqofjD6IVM
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 7, 2015