सध्या अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच अजय लवकरच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून दिग्दर्शक प्रकाश झा त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. अजय आणि प्रकाश झा पाच वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.

कोणत्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित असणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. या दोघांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘दिल क्या करे’, ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘राजनिती’, ‘सत्याग्रह’ या चित्रपटांसाठी अजय देवगण आणि प्रकाश झा यांनी सोबत काम केलं आहे. या जोडीने दमदार चित्रपट केल्याने आता प्रेक्षकांचीही नवीन चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे.

#MeToo : मीसुद्धा त्या प्रसंगाला बळी पडले- रेणुका शहाणे

अजयच्या ‘तानाजी’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो पूर्ण वेळ प्रकाश झा यांच्या चित्रपटासाठी देणार आहे. ‘तानाजी’ची शूटिंग नुकतीच सुरू झाली आहे. या चित्रपटात सलमान खान महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे ‘तानाजी’ चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Story img Loader