विमल पान मसाला जाहिरातीवरून अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) सगळ्यांची माफी मागितली आहे. या जाहिरातीत तो अजय देवगण (Ajay Devgn) आणि शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) दिसला होता. आता या प्रकरणावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजयने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजयने नुकतीच ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली. यावेळी अजय म्हणाला, “असे काही प्रोडक्ट्स आहेत जे हानिकारक आहेत आणि काही नाहीत. मी त्याचे नाव घेणार कारण मला त्याचा प्रचार करायचा नाही. मी वेलचीची जाहिरात करतो. मी जाहिराती पेक्षा हा विचार करतो की, जर कोणती वस्तू इतकी वाईट आहे तर त्याची विक्री व्हायला नको. एखाद्या गोष्टीची जाहिरात करणे हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकजण स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम आहे.”

आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…

आणखी वाचा : इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर, पलक तिवारीने पहिल्यांदाच केले वक्तव्य म्हणाली…

याप्रकरणी अक्षय कुमारने सध्या सगळ्या चाहत्यांची माफी मागितली आहे. अक्षयने रात्री १ वाजेनंतर एक ट्वीट करत लिहिले, “मी तुम्हा सर्वांची, माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. भूतकाळातील तुमच्या प्रतिक्रियेचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूचे सेवन केले नाही आणि करणार नाही. एक माणूस म्हणून मी माझे पाऊल मागे घेतो. मला जी काही फी मिळाली आहे, ती मी चांगल्या कामासाठी वापरेन. मी वचन देतो की भविष्यात मी विचारकरून जाहिरात निवडेन. त्या बदल्यात, मी नेहमी तुझ्या प्रेमाची मागणी करतो.”

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

नेमकं प्रकरण काय?

अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीची सुरुवात शाहरुख खान आणि अजय देवगणने हा अक्षय कुमारचे ‘विमल युनिव्हर्स’मध्ये स्वागत करत होते. या जाहिरातीच्या निमित्ताने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार बॉलिवूडचे तीन मोठे स्टार पहिल्यांदाच एका जाहिरातीत झळकले होते. पण ही जाहिरात तंबाखूच्या ब्रँडची असल्याने अनेकांनी त्यावर निशाणा साधला होता.

आणखी वाचा : “हे पद्मश्रीला पात्र आहेत का?” अक्षय, शाहरूख आणि अजय देवगणच्या तंबाखूच्या जाहिरातीवर भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

यानंतर अनेकांनी अक्षय कुमारचे जुने व्हिडीओ शेअर करत त्याला त्याच्या वक्तव्यांची आठवण करुन दिली होती. या व्हिडीओत अक्षय हा दारु, सिगारेट, तंबाखू यासारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn reaction on akshay kumar vimal pan masala advertisment controversy says it is a presonal choice dcp