दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटानं प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांना मात दिली. या चित्रपटावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. यात आता प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचीही भर पडली आहे. अजयनं पहिल्यांदाच या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजय देवगणच्या ‘रनवे ३४’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या निमित्तानं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत अजयला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी ‘प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सत्य घटनांवर आधारित चित्रपट तयार करणं ही चांगली आयडिया आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अजय म्हणाला, ‘नाही, असं नाही आहे. हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. जेव्हा तुम्ही एखादी कथा ऐकता. जसं की मी याआधी ‘लेजेंड ऑफ भगत सिंह’ यांसारखे चित्रपट केलेत. या अशा सत्य कथा खूप प्रेरणादायी असतात. काही सत्य घटना या एवढ्या कमाल असतात की तुम्ही त्यावर काल्पनिक कथा लिहू शकत नाही.’
आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”
अजय देवगण पुढे म्हणाला, ‘एखादी सत्य घटना किंवा ओरिजिनल स्क्रिप्ट असावी अशी कल्पना डोक्यात नसते. पण जेव्हा तुम्ही एखादी सत्य घटना वाचता त्यावेळी तुम्हाला वाटतं की ही गोष्ट असामान्य आहे आणि ही गोष्ट लोकांसमोर आली पाहिजे. तेव्हा तुम्ही त्याची निवड करता. नाही तर आपण कथा लिहितो, तयार करतो. काही कथा ऐकल्यावर समजतं की ही सर्वांसमोर मांडायली हवी किंवा नाही.’
आणखी वाचा- राणी- अभिषेकच्या ब्रेकअपचं कारण ठरला बिग बींसोबतचा ‘तो’ किसिंग सीन? वाचा नेमकं काय घडलं
‘द कश्मीर फाइल्स’बाबत बोलायचं तर हा चित्रपट विवेक अग्नीहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी राधिका मेनन ही भूमिका साकारली आहे. तर पुष्कर नाथ यांच्या भूमिकेत अनुपम खेर दिसत आहेत. या व्यतिरिक्त दर्शन कुमार, भाषा सुंबली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ११ मार्चला हा चित्रपट केवळ ७०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहता या स्क्रिन्स नंतर ४००० पर्यंत वाढवण्यात आल्या. दरम्यान या चित्रपटाच्या कमाई बद्दल बोलायचं तर १० दिवसांमध्ये या चित्रपटानं १९२.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचं बजेट १५ ते २० कोटी रुपये एवढं होतं.