‘सन ऑफ सरदार’ च्या यशानंतर अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी प्रभुदेवाच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडीला प्रभुदेवाने या चित्रपटासाठी करारबध्द केले असून, चित्रपटाची निर्मिती ‘बाबा फिल्मस’चे गोरधान तनवाणी यांनी केली आहे.
‘विक्की डोनर’ मधून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली यामी गौतम  देखील या चित्रपटात एक विशेष भूमिका साकारत आहे. अजय देवगन जरी प्रभुदेवाबरोबर पहिल्यांदा काम करत असला तरी सोनाक्षीने याआधी ‘ओ माय गॉड’ मध्ये प्रभुदेवाबरोबर एका गाण्यावर पाय थिरकवले आहेत. त्याचबरोबर तिने प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या ‘रावडी राठोड’ आणि ‘रॅम्बो राजकुमार’ मध्ये भूमिका केल्या आहेत.
येत्या जुलै पासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn sonakshi sinha to star in prabhu devas next