यावर्षी ५०० कोटींची कमाई करणा-या दीपिकाच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘रेस २’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ यांसारख्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता दीपिका ही अजय देवगणसोबत ‘सिंगम २’मध्ये रोमान्स करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, या चित्रपटाच्या चित्रीकरणास पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
दीपिका पादुकोण आणि अजय देवगण पहिल्यांदाच एकत्र चित्रपट करणार असून दीपिकाचा हा रोहितसोबत दुसरा चित्रपट असणार आहे. ‘सिंगम २’ पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सध्या, दीपिका ‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रिकणात व्यस्त असून, रणवीर सिंग आणि तिची प्रमुख भूमिका असलेला ‘राम लीला’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा