बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्याचे काही फोटो बरेच चर्चेत आहे. अजय देवगणनं नुकतंच केरळच्या सबरीमाला मंदिराला भेट देत भगवान अयप्पा यांचं दर्शन घेतलं. अजयचे हे फोटो आणि काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या मंदिरात जाण्याआधी करावं लागणारं ४१ दिवसांचं व्रतही अजयनं केलं असल्याचं बोललं जात आहे.

अजय देवगणनं नुकतंच सबरीमाला मंदिरात जाऊन देव अयप्पांचं दर्शन घेतलं. ४१ दिवसांच्या कठीण उपासनेनंतर डोक्यावर इरुमूडी घेऊन तो सबरीमाला मंदिरांत पोहोचला होता. त्याचे यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ४१ दिवसांच्या व्रतासाठी काळे कपडे घालणं, चप्पल न वापरता फिरणं, जमिनीवर झोपणं, रोज संध्याकाळी पूजा करणं आणि तुळशीची माळ गळ्यात घालणं या नियमांचं पालन करावं लागतं आणि अजयनं या नियमांचं पालन केल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन केलं.

adinath kothare
आदिनाथ कोठारे नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो पोस्ट करत सांगितलं चित्रपटाचं नाव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shri Mangalmurti s maghi Rath Yatra
श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
gangster subhash singh to bring in vasai in samay chauhan murder case after discharge from hospital
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर अखेर कारागृहात; समय चौहान हत्याकांडात वसईत आणण्याचा मार्ग मोकळा
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा
राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं?

दरम्यान अजयनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो काळ्या कपड्यांमध्ये आणि चप्पल न घातलेल्या लूकमध्ये दिसत होता. त्यावरून हा त्याच्या आगामी चित्रपटाचा लूक असल्याचं बोललं जात होतं. अजय देवगण बुधवारी देवदर्शन करून परत आला. अजयच्या अगोदर अमिताभ बच्चन आणि विवेक ऑबेरॉय या कलाकारांनीही ही कठीण पूजा केली आहे.

अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच दाक्षिणात्य चित्रपट ‘कैथी’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या हिंदी चित्रपटाचं नाव ‘भोला’ असणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘थँक गॉड’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Story img Loader