बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘शिवाय’ या महत्वाकांक्षी चित्रपटाचे चित्रीकरण येत्या ७ नोव्हेंबरपासून मसुरीत सुरू होत आहे. चित्रपटात अजय केवळ अभिनय करणार नसून, दिग्दर्शनदेखील करणार आहे. दिग्दर्शनाचा त्याचा हा दुसरा प्रयत्न असून, या आधी त्याने ‘यू मी और हम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची नात शयेशा सैगल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मसुरीमधील पहिल्या टप्प्यातील चित्रीकरणानंतर हैद्राबादमध्ये शुटिंग करण्यात येणार असून, चित्रपटाचा मोठा भाग बल्गेरियात चित्रीत होणार आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाची रुपरेषा आखण्यात जवळजवळ वर्षभराचा कालावधी लागला होता. पुढील वर्षी २८ ऑक्टोबरला अजयचा ‘शिवाय’ आणि करण जोहरचा ‘ए दिल हैं मुश्किल’ चित्रपटगृहात झळकणार आहेत.
अजयच्या ‘शिवाय’चे लवकरच मसुरीत चित्रीकरण सुरु!
'शिवाय' हा अजय देवगणचा महत्वाकांक्षी चित्रपट.
First published on: 02-11-2015 at 19:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgns shivaay to begin shooting in mussoorie