मराठी चित्रपट कलाकृतींचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान करणारे पुरस्कार सोहळे सर्वत्र चर्चेत असताना ‘अजिंक्यतारा’ ह्या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याची अनुभूती ही लवकरच मराठी रसिकांना घेता येणार आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘अजिंक्यतारा’ पुरस्काराच्या आयोजकांनी हे पहिलं पाऊल उचललं आहे. सुपरविस्टा एंटरटेण्मेंटने ‘अजिंक्यतारा’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.या पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा नुकतीच मुंबईत एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी अजिंक्यताराच्या सन्मानचिन्हाचे अनावरण सुपरविस्टा एंटरटेण्मेंटनच्या प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आलं. सुपरविस्टा एंटरटेण्मेंटनचे प्रतिनिधी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हा दिमाखदार सोहळा २२ ऑगस्टला मॉरिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याआधी होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून सामाजिक व आध्यात्मिकतेचं भान जपत वेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी ही असणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचा हेतू केवळ मनोरंजन नसून या सोहळ्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवसाय वृद्धी करण्याचाही आयोजकांचा मानस आहे. या पुरस्कार सोहळ्यासोबत राबवल्या जाणाऱ्या अनेक सामजिक उपक्रमांमुळे चांगला पायंडा पाडला जाईल असा विश्वास आयोजकांना आहे. या सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावान कलावंत रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहेत. या पुरस्काराच्या झगमगाटात कलाविष्काराच्या अनोख्या मैफिली रंगणार आहेत. नृत्य-गाणी, विनोदी प्रहसन अशा बहारदार मेजवानीने रंगलेला मराठी कलावंतांचा इंटरनॅशनल जागर मराठी कलासंस्कृतीला वेगळं आयाम मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
‘सुपरविस्टा एंटरटेण्मेंट’ आयोजक असलेल्या या पुरस्कर सोहळ्यासाठी ‘सिनेयुग ग्रुप ऑफ कंपनी’ इव्हेंट मॅनेजमेंट पार्टनर असून ‘किड्झेनिया’ मुंबई वेन्यु पार्टनर असणार आहेत.
मॉरिशस मध्ये रंगणार ‘अजिंक्यतारा’
मराठी चित्रपट कलाकृतींचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान करणारे पुरस्कार सोहळे सर्वत्र चर्चेत असताना ‘अजिंक्यतारा’ ह्या आगळ्या वेगळ्या पुरस्कार
First published on: 01-06-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkyatara award in mauritius