Ajith racing accident Viral Video : साउथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार हा सध्या दुबई २४एच (Dubai 24H) शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यान मंगळवारी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये कार रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी उभारलेल्या कठड्याला धडकताना दिसत आहे. या धडकेनंतर गाडी जागेवर काही काळ फिरत राहते आणि अखेर थोड्यावेळाने थांबते. सुदैवाने अजित कुमार याला या अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही आणि तो अपघात झालेल्या गाडीपासून दूर जाताना दिसत आहे. या अपघातात अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र इकडे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे.

अभिनेता अजित कुमार पहिल्यांदाच स्पोर्ट रेसिंगमध्ये सहभागी झालेला नाही. लहान वयापासून अजित याला रेसिंगची आवड आहे. इतकेच नाही तर त्याने २००० च्या दशकात रेसिंग करियरवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपल्या अभिनयापासून ब्रेक देखील घेतला होता. दरम्यान आता तब्बल एका दशकाहून अधिक काळानंतर तो अजित कुमार रेसिंग नावाच्या त्याच्या नव्याने तयार केलेल्या संघाच्या माध्यमातून तो रेसिंग सर्किटवर परतला आहे.

हेही वाचा>> भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज

अजित कुमार यांच्या टीमने या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कार बॅरिअरला धडकते आणि चार ते पाच वेळा गोल फिरताना दिसत आहे. यानंतर अभिनेता अजित कारमधून बाहेर पडतो. अजित यांचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी अभिनेत्याच्या आरोग्यसंबंधी माहिती देताना सांगितले की, “अजित यांना कुठलीही दुखापत झाली नाही, तो पूर्णपणे बरा आहे. ही घटना घडली तेव्हा तो १८० किलोमीटर वेगाने गाडी चालवत होता”.

दुबई २५एच (Dubai 24H) ही एक टीम रेसिंग स्पर्धा आहे. अजित आणि त्याच्या संघातील ड्रायव्हर फॅबियन डफीक्स, मॅथ्यू डेट्री (बेल्जियम) आणि कॅमेरॉन मॅक्लिओड (ऑस्ट्रेलिया) हे ९९२ क्लासमध्ये सहभागी होणार आहेत. ही रेसिंग स्पर्धा ११ जानेवारी रोजी होणार आहे.

त्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलाचयेच झाल्यास अजितने त्याच्या गुड बॅड अग्ली चित्रपटातील त्याचे काम पूर्ण केले आहे. हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajith kumar accident at dubai 24h racing practice car crash video goes viral marathi news rak