चित्रपटाचं शूटिंग झालं किंवा एखादा प्रकल्प पूर्ण झाला की सेलिब्रिटी कामातून ब्रेक घेऊन फिरायला जातात. आता एक अभिनेता रोड ट्रिपवर निघाला आहे. या अभिनेत्याचे रोड ट्रिपमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अभिनेत्याने रोड ट्रिपवर गेल्यानंतर बरोबर असलेल्या मित्रांसाठी एक खास पदार्थ बनवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार बाईकने मध्य प्रदेशात रोड ट्रिपवर गेला आहे. या बाईक ट्रिपने तो पुन्हा एकदा चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अजित त्याचा सहकलाकार अभिनेता आरव व इतर काही जणांबरोबर या रोड ट्रिपवर गेला आहे.

एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनली मराठमोळी अभिनेत्री, सहा महिन्यात झालेला घटस्फोट; तर दुसरं लग्नही मोडलं, तिचा पहिला पती…

प्रवासात एकेठिकाणी थांबल्यावर अजितने त्याच्या मित्रांसाठी बिर्याणी बनवली. अजितचा स्वयंपाक करतानाचा एक व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. सुरेश चंद्रा नावाच्या अकाउंटवरून अजितचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तो बिर्याणी बनवताना दिसत आहे. आधीच्या काही व्हिडीओंमध्ये अजितने बाईक रायडिंग टिप्स दिल्या होत्या. मेंदूतील नस सुजल्यानंतर अजितवर उपचार करण्यात आले होते, त्यातून बरे झाल्यावर तो या रोड ट्रिपवर गेला आहे.

अजितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आगामी ‘विडा मुयर्ची’ या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग पूर्ण केलं आहे. अजित, त्रिशा, रेजिना कॅसँड्रा, अर्जुन सर्जा आणि आरव अभिनीत हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल, अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajith kumar made biryani for fellow bike riders at road trip video viral hrc