चाहत्यांचा लाडका थाला तमिळ सुपरस्टार अजित कुमारच्या टीमने ‘दुबई 24H’ (2025) रेसमध्ये शानदार विजय मिळवला असून, त्याच्या चाहत्यांसाठी हा खूपच आनंदाचा क्षण ठरला आहे. यामुळे अजित कुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतील या सुपरस्टारच्या ‘अजित कुमार रेसिंग बाय बास कोएटन’ टीमने 991 कॅटेगरीमध्ये तिसरे स्थान मिळवले, अशी माहिती त्यांच्या मॅनेजर सुरेश चंद्र यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली. विशेष म्हणजे, अजित कुमार यांना GT4 कॅटेगरीमध्ये ‘स्पिरिट ऑफ द रेस’ सन्मानाने गौरविण्यात आले. “ब्रेक फेल्युअरमुळे झालेल्या अपघातानंतर हे एक उल्लेखनीय पुनरागमन आहे,” असे चंद्र यांनी म्हटले.

हेही वाचा…“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…

अजित कुमारचा या रेससाठी सराव करताना अपघात झाला होता. त्याच्या कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला होता. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या क्लिपमध्ये, एक गाडी रेस ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सेफ्टी गार्डवर आदळत असल्याचे आणि थोडा वेळ फिरत राहिल्याचे दिसले होते. मात्र, त्या अपघातातून अभिनेता सुखरूप बाहेर पडला. या अपघातानंतर, टीमने एक निवेदन प्रसिद्ध करत सांगितले की अजित यांनी “आगामी दुबई 24H सिरीजसाठी अजित कुमार रेसिंगमधून गाडी चालवण्याचा निर्णय मागे घेतला.”

परंतु, टीमने पुढे सांगितले, “एका धाडसी निर्णयानंतर, अजितने ‘अजित कुमार रेसिंग बाय बास कोएटन’ (Porsche 992 कप कार क्रमांक 901) च्या मालकाच्या भूमिकेत राहणे आणि त्याचवेळी ‘अजित कुमार रेसिंग बाय राझून’ (Porsche Cayman GT4 क्रमांक 414) साठी चालक म्हणून स्पर्धा करणे अशा दुहेरी भूमिकेत काम केले.”

हेही वाचा…जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

अभिनेता अजितने हा विजय मिळवल्यानंतर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आर. माधवन, जो अजितबरोबर रेस जिथे झाली तिथे उपस्थित होता, यानेही आपल्या मित्राच्या अप्रतिम कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे. “अतिशय अभिमान वाटतो… काय व्यक्तिमत्व आहे. एकमेव अजित कुमार ,” असे माधवनने लिहिले आणि अजितचा भारतीय ध्वज हातात घेऊन व्हिडीओ पोस्ट केला. दिग्दर्शक अधिक रविचंद्रन यांनीही अजितचा ट्रॉफी स्वीकारतानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “तुम्ही भारताचा अभिमान वाढवलात. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो सर. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे.”

हेही वाचा…अभिनेते टिकू तलसानिया यांना आला होता ब्रेनस्टॉक, मुलगी शिखाने दिली प्रकृतीची माहिती; पोस्ट करत म्हणाली…

रेस संपल्यानंतर, X (पूर्वीचे ट्विटर) वर अजितच्या कुटुंबीयांसह आणि टीमबरोबर विजय साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांनी शेअर केले आहेत. अजितची पत्नी शालिनी आणि त्याची मुलं अनुष्का आणि अद्विकही या क्षणी उपस्थित होते.

Story img Loader