भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा सिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अशातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती हमसून हमसून रडताना दिसत आहे. तसेच तिने समर सिंहवर आरोपही केले आहेत. हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम लाइव्हचा आहे.

बिश्नोई गँगकडून सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, राखी सावंतलाही दिला इशारा

myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आकांक्षा रडत म्हणत आहे की, “मला माहीत नाही की माझ्याकडून काय चूक झाली, मी या जगात राहायचं नाही. हा माझा तुमच्याबरोबरचा शेवटचा विषय आहे, मला काही झाले तर त्याला समर सिंह जबाबदार असेल.” दरम्यान, यात तिने तिला काही झाल्यास समर सिंह जबाबदार असेल, असं म्हटलंय. त्यामुळे या आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात समर सिंहवरील संशय बळावला आहे.

२४ दिवसांनंतर आकांक्षाचा ३८ सेकंदांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर एकीकडे कलम ३०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यावरून पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे आकांक्षाची आई मधू दुबे यांनी समर सिंहचं समर्थन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच समर सिंहने हॉटेल मॅनेजर संदीप सिंग आणि इतरांच्या मदतीने आपल्या मुलीची हत्या घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला. आकांक्षा दुबे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, त्यानंतर हत्येच्या कारणांचा उलगडा होईल, अशी विनंती आकांक्षाची आई मधु यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. या आत्महत्या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर येत आहेत.

“ॲडल्ट चित्रपट बघायला जाताना मला…” सचिन पिळगांवकरांचा कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठा खुलासा

दरम्यान, गुन्हे शाखेने समर सिंहला दिल्लीजवळच्या गाझियाबादमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. आकांक्षांचा मृत्यू झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या चार्म्स क्रिस्टल सोसायटीमध्ये लपला होता. सध्या तो अटकेत आहे, अशातच आकांक्षाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Story img Loader