भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी २६ मार्च रोजी वाराणसीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्या मृत्यूमागील कारणांचा तपास पोलीस करत आहेत. आत्महत्येच्या काही तास आधीपर्यंत आकांक्षा दुबे पूर्णपणे सामान्य होती, नंतर मध्यरात्री हॉटेलवर परतल्यानंतर काय झाले की तिने एवढे मोठे पाऊल उचलले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Akanksha Dubey Suicide: आकांक्षा दुबे राहत असलेल्या रुममध्ये सुसाईड नोट मिळाली का? पोलीस म्हणाले…

शनिवारी रात्री आकांक्षा दुबे कुठे होती आणि काय करत होती याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ती शनिवारी रात्री हॉटेलमधून मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती, अशी माहिती तिच्या हेअरस्टाइलिस्टने दिले आहे. आकांक्षा रविवारी सकाळपासूनच तिच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करणार होती. ती इतर क्रू मेंबर्ससह वाराणसीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती.

“रात्री पार्टीला गेली, सकाळी १० वाजता…” आकांक्षा दुबेच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? अभिनेत्रीच्या हेअर आर्टिस्टने सांगितला घटनाक्रम

‘टीव्ही 9’ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, आकांक्षा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलच्या मॅनेजरने शनिवारी रात्री घडलेला प्रकार सांगितला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आकांक्षा शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १.५५ वाजता हॉटेलमध्ये परतली होती. दरम्यान, हॉटेलमध्ये आकांक्षा दुबे एकटीच आली नव्हती तर तिच्यासोबत एक तरुणही आला होता, असा दावा मॅनेजरने केला आहे. हॉटेलमध्ये पोहोचलेली आकांक्षा धडपडत होती. त्यामुळे तिच्याबरोबर आलेला तरुणी तिला रुममध्ये सोडण्यासाठी गेला आणि १७ मिनिटांनी तो परत आला होता, असा दावा मॅनेजरने केला आहे.

परिणीती चोप्रा-खासदार राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार? दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू

यानंतर सकाळी उशिरापर्यंत आकांक्षाने रूम न उघडल्याने सर्वजण चिंतेत पडले. तिच्या खोलीतील लाईटही सुरू होती आणि बाथरूमचा नळही चालू होता. मास्टर चावीने तिची खोली उघडली असता आकांक्षाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही आत्महत्या असल्याचे समजून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.