लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली. हॉटेलमधील रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. आकांक्षाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या गायक व अभिनेता समर सिंहबरोबर असलेल्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे.

आत्महत्या करण्याच्या महिन्याभरापूर्वीच आकांक्षाने प्रेमाची कबुली दिली होती. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आकांक्षाने समर सिंहबरोबरचा रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. या फोटोला तिने “व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा” असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केले होते. या पोस्टद्वारे आकांक्षाने तिच्या व समर सिंहच्या नात्याचा खुलासा केला होता. आकांक्षा व समर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही चर्चा रंगली होती.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

हेही वाचा>> आकांक्षा दुबे समर सिंहबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती? अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले “तो तिच्या…”

आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंहवर कुटुंबियांनी आरोप केले आहेत. समर सिंह व त्याचा भाऊ संजय सिंहला अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी कुटुंबियांनी जबाबदार धरलं आहे. आकांक्षांचं कोटी रुपयांचं मानधन दिलं नसल्याबरोबरच तिला जीवे मारण्याछी धमकी दिल्याचा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला आहे. तर आकांक्षा व समर लिव्ह इनमध्ये राहत नव्हते. समर सिंहच तिच्या पाठीमागे लागला होता, असं अभिनेत्रीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

हेही वाचा>> “समर सिंह आणि त्याच्या भावाने हत्या केली” २५व्या वर्षी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दुबेच्या आईचे गायकावर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्याने २१ मार्चला…”

हेही वाचा>> “रात्री पार्टीला गेली, सकाळी १० वाजता…” आकांक्षा दुबेच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? अभिनेत्रीच्या हेअर आर्टिस्टने सांगितला घटनाक्रम

आकांक्षाच्या हॉटेलमधील रुममध्ये कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Story img Loader