प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानीने ३१ मे रोजी गोंडस मुलीला जन्म दिला होता. आकाश व श्लोका दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांना दोन वर्षांचा मुलगा पृथ्वी आहे. आकाश व श्लोका यांना मुलगी झाल्यानंतर अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. अंबानी कुटुंबाकडून आपल्या लाडक्या लेकीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी पृथ्वीक प्रतापला किती मानधन मिळतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

अंबानी कुटुंबाने एक छानसे कार्ड बनवून आकाश व श्लोकाच्या मुलीच्या नावाची घोषणा केली. या कार्डमध्ये पृथ्वीने त्याच्या चिमुकल्या बहिणीचं नाव काय ठेवलंय, हे सांगितलं. पृथ्वीच्या लहान बहिणीचं नाव वेदा असं ठेवण्यात आलं आहे. अंबानी कुटुंबाने लाडक्या लेकीसाठी वेदा हे नाव निवडलंय. व्हायरल झालेल्या या कार्डमध्ये अंबानी व मेहता कुटुंबातील सदस्यांची शुभेच्छुक म्हणून नावं आहेत.

आकाश अंबानी व श्लोका अंबानी यांचं चार वर्षांपूर्वी २०१९ साली लग्न झालं होतं. लग्नानंतर दोन वर्षांनी २०२१ साली श्लोकाने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव पृथ्वी अंबानी आहे. त्यानंतर आता आकाश व श्लोका पुन्हा एकदा पालक झाले असून त्यांनी मुलीचं नाव वेदा असं ठेवलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash ambani shloka mehta daughter name veda ambani hrc