‘सैराट’ चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले कलाकार अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे आणि सोल मीडियावर लाइव्ह सेशनच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधतात तसेच अनेकदा हे दोघंही चाहत्यांना आपल्या कामाचे आणि आगामी चित्रपटांविषयीचे अपडेट देत असतात. ‘सैराट’ चित्रपटानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पाहायला मिळतं. पण आकाश रिंकूला कोणत्या खास नावाने हाक मारतो याचा खुलासा त्याच्या एका पोस्टमधून झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू राजगुरू लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू एका अॅसिड अॅटॅक झालेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रिंकूला या नव्या अंदाजात पाहायला चाहते बरेच उत्सुक आहे. ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा ट्रेलर आकाशनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत.

आकाशनं ट्रेलरची लिंक शेअर करताना आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘खूप साऱ्या शुभेच्छा राजगुरू’ या पोस्टमध्ये त्यानं रिंकूला टॅग केलं आहे. त्याच्या याच पोस्टमधून आकाश रिंकूला ‘राजगुरू’ या नावने हाक मारत असल्याचा खुलासा झाला आहे. रिंकूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- पतीपासून २७ वर्षं वेगळं राहूनही डिंपल यांनी घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता यामागचं कारण?

दरम्यान रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित २०१६ साली प्रदर्शित झालेला त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. एवढंच नाही तर हिंदीमध्ये या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटानंतर आकाश आणि रिंकू यांच्यात चांगली मैत्री आहे. अनेकदा हे दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.