सध्या अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देशातील आणि देशाबाहेरील चित्रपटगृहांमध्येही ‘सैराट’चाच बोलबाला आहे. या चित्रटपटातील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. नेटिझन्सही याबाबत बरीच चर्चा करतायंत. त्यातचं आता  गुगलनेही ‘सैराट’ची विशेष दखल घेतली असून, चित्रपटातील परशा म्हणजेच आकाश ठोसरवर खास प्रेम दाखवले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात भाव खाऊन जाणाऱ्या आर्चीला गुगलवर परशा भारी पडल्याचे चित्र आहे. गुगलवर ‘परशा’ किंवा ‘आकाश ठोसर’ या नावाचा सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे कळते.
‘सैराट’मधील संवाद, कलाकार, संगीत, लोकेशन्स आणि नागराजचे दिग्दर्शन सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यामुळे गुगलवर सैराट विषयी बराचं सर्च केला जातोय. त्यामध्ये सर्वाधिक सर्च हा ‘परशा’ किंवा ‘आकाश ठोसर’ या नावाचा होत आहे. सैराट मधल्या आर्चीची छाप प्रेक्षकांवर चित्रपट पाहात असताना पडत असली तरी, गुगल ट्रेण्डमध्ये मात्र, परशाच सर्च होतोय. विकिपिडियानेही आकाश ठोसर याचे खास पेज तयार केले आहे.

Story img Loader