अभिनेता आकाश ठोसर हा सैराट या चित्रपटामुळे प्रेकाश झोतात आला. आकाश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. लवकरच आकाश अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आकाश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर आमिर खानसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आकाशाने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत आकाश आमिर खान यांना भेटताना दिसतो. हा व्हिडीओ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळीचा आहे. स्क्रिनिंग झाल्यानंतर आमिर संपूर्ण टीमला भेटला. त्यावेळी आमिर आकाशला झुंड या चित्रपटाविषयी सांगताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करत माझ्या आयुष्यातिल अविश्वसनीय क्षण असे कॅप्शन आकाशने दिले आहे.
आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.