दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार नागार्जुन आणि त्याचे कुटुंबीय कायमच चर्चेचा विषय ठरतात. नागार्जुनची दोन्ही मुले नागाचैतन्य आणि अखिल अक्किनेनी देखील त्यांच्या आगामी प्रोजेक्टस व खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण सुपरस्टारचा मुलगा असल्यामुळे अखिलसाठी अनेक गोष्टी कठीण झाल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
अखिलने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे. ‘स्वत:ला आयुष्यात काय करायचे हे शोधणे फार कठीण असते. खास करुन जेव्हा तुमच्या घरात अनेक अभिनेते असतात आणि त्यांचा प्रभाव तुमच्यावर असतो. त्यांच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी खूप काही लागते. त्याच्या चाहत्यांकडून आणि आपल्या चाहत्यांकडून पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी करण्याचा खूप दबाव असतो. ही एक मोठी जबाबदारी असते. त्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत’ असे अखिल अक्किनेनी म्हणाला.
आणखी वाचा : ‘New Home Member’, दिलीप जोशींनी खरेदी केली नवी कार
पुढे अखिल कुटुंबातील इतर सदस्यांची तुलना करण्याबाबत म्हणाला, ‘मला चांगले माहितीये की मी कोण आहे आणि कुठून आलो आहे. मी मेहनत करुन स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी इथे काम करण्यासाठी आलो आहे, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही उलट मी माझ्या कामाकडे सर्वात जास्त लक्ष देतो.’