श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. बॉलिवूड पदार्पणापूर्वीच जान्हवी आतापर्यंत अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. ती अक्षत रंजनला जान्हवी डेट करत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. मात्र जान्हवी कपूर आणि अक्षत रंजनमध्ये एका व्यक्तीमुळे दुरावा निर्माण होतोय. ही व्यक्ती इतर कोणीही नसून अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर आहे.

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी आणि इशान भूमिका साकारणार आहेत. यामध्ये जान्हवी आर्चीच्या भूमिकेत तर इशान परशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इशान-जान्हवीला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. प्रियांका चोप्राचा ‘बेवॉच’ हा चित्रपट पाहण्यासाठी इशान आणि जान्हवी एकत्र गेले होते. शिवाय याआधीसुद्धा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट पाहण्यासाठी हे दोघं एकत्र गेले होते. दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असल्याने अक्षतला त्याच्या नात्याबाबत असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे अशी चर्चा आहे. यामुळेच अक्षत आणि जान्हवीमध्ये सध्या दुरावा निर्माण झालाय.

वाचा : तुमचा हिंदू धर्म लोकांचा गळा कापायला शिकवतो का?; कथित गोरक्षकांवर स्वराचा राग

इशानसोबत नाव जोडलं जाण्यापूर्वी जान्हवी ही शिखर पहरीयासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात होतं. विविध कार्यक्रमांनाही जान्हवीच्या कुटुंबियांसोबत शिखर हजेरी लावायचा. पण, एकाएकी या रिलेशनशिपमधून शिखरची एक्झिट होऊन इशानची एण्ट्री झाली. आता इशान-जान्हवीचं रिलेशनशिप स्टेटस नेमकं काय आहे हे तर योग्य वेळ आल्यावरच समजू शकेल. बॉलिवूड पदार्पणाआधीच चर्चेत राहणारी जान्हवी आता आपल्या चित्रपटांमधून काय कमाल दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader