बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा या जोडीचा ‘हॉलिडे : ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी’ हा चित्रपट उद्या (६ जून) प्रदर्शित होत आहे. अशातच ही स्टार-जोडी चित्रपटाची जोमाने प्रसिध्दी करत आहे. मोठ्या पडद्यावरील ही जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच पसंत केली जाते. त्याचप्रमाणे, मोठ्या पडद्यावरील या दोघांमधील केमिस्ट्री एक वेगळाच अनुभव देते. असाच काहीसा अक्षय आणि सोनाक्षीमधील फुल-टू-रोमांस टीव्हीवरील लोकप्रिय डान्स शो ‘झलक दिखला जा’च्या सेटवर पाहायला मिळणार आहे. सोनाक्षीला बुलेटवर बसवून अक्षय ‘झलक…’च्या मंचावर अवतरला आणि खूप प्रेमाने त्याने तिला मंचभर फिरवले. एवढेच नव्हे तर दोघांनी स्पर्धकांबरोबर खूप धमाल-मस्तीदेखील केली.

Story img Loader