२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पटियाला हाऊस’ या चित्रपटातील अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया ही मायलेकाच्या भूमिकेतील जोडी सर्वांनाच आवडली. त्यांच्या चाहत्यांसाठी आता पुन्हा एकदा खुशखबर आहे. एका चित्रपटासाठी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा चुलत भाऊ आणि अक्षय कुमारचा मेहुणा करण कपाडिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. टोनी डिसूझाच्या प्रॉडक्शनअंतर्गत तयार होणार्या या चित्रपटातून करण पदार्पण करणार आहे. अक्षय त्याच्या मेहुण्याला लाँच करण्यासाठी केवळ मदत करत नसून आता त्या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारणार आहे. डिंपल कपाडियाचीही यात छोटी भूमिका असणार आहे.

https://www.instagram.com/p/BYwHKOnAW6G/

वाचा : ‘पुन्हा बोल्ड सीन करणार नाही’

टोनी डिसूझासोबत अक्षयने ‘ब्लू’ आणि ‘बॉस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय आणि अक्षयचे त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे टोनीने करणला लाँच करावं अशी अक्षयची इच्छा आहे. सिंपल कपाडिया यांचं निधन झाल्यानंतर डिंपल, ट्विंकल आणि अक्षय हेच करणचं कुटुंब आहे. १४ वर्षांचा असतानाच चित्रपटात काम करण्याची आवड असल्याचं अक्षय आणि मावशी डिंपल यांना सांगितलं होतं असं करण म्हणतो. त्याचबरोबर हा प्रवास माझ्यासाठी सोपा नसेल असंही त्यांनी बजावलं असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader