नुकताच प्रदर्शित झालेल्या एअरलिफ्ट या चित्रपटानंतर अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक जबरदस्त चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. ‘हॉलीडे २’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि हृतिक रोशन हे बॉलीवूडमधील दोन अॅक्शन हिरो पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एकाचवेळी दुहेरी मनोरंजनाचा आनंद घेता येईल.
‘हॉलीडे २’चा पोस्टर प्रदर्शित झाला असून, यात अक्षय कुमार आणि हृतिक रोशन टफ लूकमध्ये दिसतात. यात अक्षयचे नाव विराट बक्षी असून हृतिक हा करण बक्षीच्या भूमिकेत दिसेल. हे दोघेही चित्रपटात भावांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. ‘हॉलीडे २’ हा २०१४ साली आलेल्या ‘हॉलीडे’ चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

holiday 2

Story img Loader