बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे बराच चर्चेत आलाय. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट रिलीज होतोय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या मेकर्सनी चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यानंतर आता हा चित्रपट थ्रीडी मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती समोर येतेय.

अक्षय कुमार स्टारर ‘बेलबॉटम’ निर्माते हा चित्रपट थ्रीडी मध्ये रिलीज करण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील तेव्हा त्यांच्या उत्साह आणखी वाढला पाहिजे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. यासाठी मेकर्स चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करून काम करत आहेत. चित्रपटातल्या व्हिज्युअल्सपासून ते साउंड इफेक्ट्स आणि बॅक ग्राउंड स्कोरचा डॉलबाय साउंडमध्ये थ्रीडी वर्जनच्या दृष्टीकोणातून काम सुरू केलंय. त्यामूळे हा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना एक सुखद अनुभव मिळणार हे मात्र नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

रिलीज डेट बदलण्याबाबत अद्याप घोषणा नाही

जर हा चित्रपट थ्रीडी मध्ये रिलीज झाला तर तो अक्षय कुमारचा थ्रीडी मधला पहिला चित्रपट ठरणार आहे. करोना परिस्थितीमुळे लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अद्याच चित्रपटगृह सुरू केलेले नाहीत. अशा परिस्थितीत ‘बेलबॉटम’ ची रिलीज डेट जाहीर करून कोणत्याच प्रकारची जोखीम न उचलण्याचा विचार निर्माते करत आहेत. जर अशा परिस्थितीत चित्रपट रिलीज केला तर हवी तितकी कमाई करता येणार असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

अशात चित्रपटाच्या मेकर्सकडून रिलीज डेट बदलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या चित्रपटाची रिलीज डेट २७ जुलै ठेवण्यात आलीय. रणजीत तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबतच हुमा कुरैशी, लारा दत्ता आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.