बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अक्षयने ३ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
२०१९ मध्ये अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा मुलाखत घेतलीस तेव्हा मनापासून प्रश्न विचारले होते असे पत्रकाराने बोलताच अक्षय म्हणाला, “मी मनापासूनच प्रश्न विचारले. एक सामान्य माणूस म्हणून मला जाणून घ्यायचे होते की आपले पंतप्रधान हातावरच घड्याळ उलटं का घालतात? कारण मला त्यांना जाणून घ्यायचे होते. मी त्यांच्याशी धोरणांवर बोलणार नाही, ते माझं काम नाही. मी तसं केलं असतं तर ते फेक दिसलं असतं. आम्ही दोघांनी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि मी विनोदही केले.”
आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं
आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत
पंतप्रधानांची मुलाखत घेणे तो अनुभव कसा होता…आश्चर्य वाटलं होतं का? कारण ही सामान्य गोष्ट नाही. यावर अक्षय म्हणाला, “हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. ते ज्याच्याशी बोलतात त्या व्यक्ती सारखे होतात. ते माझ्याशी बोलतात तर माझ्यासारखे होतात आणि लहान मुलांसोबत बोलतात किंवा त्यांच्यासोबत असतात तेव्हा त्यांच्यासारखे असतात.”
आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
अक्षय कुमारने केंद्रीय मंत्र्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जून रोजी गृहमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री हा चित्रपट पाहणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीही तिथे उपस्थित राहणार आहेत.