‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-2’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असलेल्या अक्षय कुमारने चित्रपटगृहात मोबाईल फोनचा वापर टाळण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करणा-या लघुपटाची निर्मिती केली आहे.  या लघुपटातील अक्षय कुमारची व्यक्तिरेखा  ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-2’ चित्रपटात अक्षय साकारत असलेल्या  गॅंगस्टर शोएबच्या व्यक्तिरेखेसारखी आहे.
सदर लघुपट शुक्रवारपासून ‘पीव्हीआर’ चित्रपटगृहात दाखविण्यात येणार आहे. या लघुपटाविषयी बोलतांना अक्षय कुमार म्हणाला, प्रेक्षकांना चित्रपटगृहात मोबाईल वापरापासून परावृत्त करण्यासाठीचा हा एक अनोखा उपक्रम आहे. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-2’ चित्रपटात मी साकारलेल्या शोएबच्या व्यक्तीरेखेमध्ये मी प्रेक्षकांसमोर येऊन मोबाईलचा वापर टाळण्याबाबत विनंती करताना या लघुपटात दाखविण्यात आले आहे. मिलान लुथेराचा हा लघुपट ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई-2’च्या प्रदर्शनापर्यंत म्हणजेच ८ ऑगस्टपर्यंत चित्रपटगृहात दाखविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा