बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. सध्या तो आणि रकुल प्रीत सिंग सध्या त्यांच्या आगामी ‘कुठपुतली’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंगची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हे दोघे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकताच अक्षय कुमारने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अक्षय कुमार त्याच्या को-स्टारसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो त्याची सहकलाकार रकुल प्रीत सिंगला एक महत्वाचा सल्ला देताना दिसत आहे. अक्षय एक हुशार अभिनेता म्हणून प्रेक्षकांमध्ये ओळखला जातो. त्यामुळे अक्षयची सल्ला देण्याची ही अनोखी स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

आणखी वाचा : “या परिस्थितीला बॉलिवूड कलाकारच जबाबदार…” अभिनेते मुकेश खन्ना यांनी घेतला कलाकारांचा समाचार

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘साथिया’ या गाण्यावर अक्षय आणि रकुल एकत्र मस्ती करत आहेत. पण वाटेत मध्येच पाणी साचल्यामुळे अक्षय रकुलला पाण्यात विटा ठेऊन रस्ता ओलांडायला मदत करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान अक्षय रकुलला अर्ध्यावर अडकवतो आणि तिने किलरशी शक्ती नाही तर बुद्धीने खेळ खेळला पाहिजे असा सल्ला तिला देऊन तिथून निघून जातो. अक्षय कुमारच्या पाठोपाठ रकुलही वैतागून पाण्यातून मार्ग काढून निघून जाते, असा हा व्हिडिओ आहे.

अक्षय कुमार आणि रकुल प्रीत यांच्या ‘कठपुतली’ या चित्रपटातील ‘साथिया’ हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय आणि रकुलची जोडी रोमान्स करताना दिसली आहे. त्याचबरोबर ‘कठपुतली’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमध्ये एक मारेकरी पोलिसांसोबत बुद्धीचा खेळ खेळताना दिसत आहे.

हेही वाचा : अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळेना, सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘रक्षाबंधन’लाही थंड प्रतिसाद

अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’ हा चित्रपट ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर येत्या २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रकुल प्रीत यांच्याशिवाय अभिनेत्री सरगुन मेहताही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ‘रत्सासन’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘रत्सासन’मध्ये विष्णु विशाल आणि अमला पॉल हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारी यांनी केलं आहे. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरी अक्षयच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader