बॉलिवूडमध्ये विविध कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. त्यातही काही कलाकारांच्या मुलांवर प्रसारमाध्यमांच्या नेहमीच नजरा असतात. अशीच एक कलाकार बाप-बेट्याची जोडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचा मुलगा आरव. एका चांगल्या अभिनेत्यासोबतच अक्षय कुमार एका चांगल्या वजिलांची भूमिकाही अगदी न चुकता पार पाडत आहे. चित्रपट आणि कुटुंबामध्ये योग्य तो समतोल राखत अक्षय नेहमीच त्याच्या भूमिका चोखपणे बजावतो.
खिलाडी कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच आरवसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह केपटाऊनला गेला असतानाचा हा फोटो. तसे पाहिले तर अक्षय त्याच्या दोन्ही मुलांच्या अगदी जवळचा आहे. पण, या केपटाऊन सफरीमध्ये मात्र त्याने आपल्या मुलासोबतच जास्त वेळ घालवल्याचे दिसत आहे. अक्षयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तो आणि त्याचा मुलगा आरव एका बाकावर पाठमोरे बसलेले दिसत आहेत. अशा या शांत वातावरणात अक्षयने त्याच्या मुलासोबत काही दुर्मिळ क्षण व्यतित केले असणार यात शंकाच नाही. या फोटोसह खिलाडी कुमारने एक भावूक कॅप्शनही लिहिले आहे. ‘तो क्षण, ज्यावेळी तुम्हाला जाणीव होते की, तुमचा मुलगा आता लहान राहिला नाही. त्याची उंचीही जवळपास माझ्याइतकीच झाली आहे, तो माझे शुजही वापरतो’, असे कॅप्शन अक्षयने लिहिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा