बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. लवकरच तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मराठी प्रेक्षकांशी अक्षयचं खास नातं आहे आणि त्यामुळेच त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यानं श्रेया बुगडेला एक स्मार्टफोन गिफ्ट दिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रेया बुगडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय. श्रेयानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार तिला एक स्मार्टफोन गिफ्ट करताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार तिला हे गिफ्ट का दिलं याचं कारण सांगितलं आहे.
अक्षय म्हणाला, ‘श्रेया मागच्या ८ वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो करत आहे आणि अलिकडे ती ‘किचन कल्लाकार’साठी सुत्रसंचालन करत आहे. पण तिच्या सोशल मीडियावर मात्र त्या शोमधील फोटो जास्त असल्याचं दिसतंय. त्यामुळेच तिला मी हा फोन गिफ्ट देतोय जेणेकरून तिने इथले फोटो देखील पोस्ट करावे.’ श्रेयाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण
श्रेया बुगडे आणि अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अक्षयच्या बोलण्याला अगदी डॉ. निलेश साबळे आणि इतर कलाकारही दुजोरा देताना दिसत आहेत. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबल्याच नाहीत. याशिवाय त्यानं ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांसोबत धम्मालही केली.