काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे.

“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.” पण चाहत्यांची जाहिर माफी मागिल्यानंतरही अक्षयला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of PM Narendra Modi.
PM Narendra Modi : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”
Jitendra Awhad Criticized Narhari Zirwal
Jitendra Awhad : “शरद पवारांना दैवत म्हणणाऱ्या नरहरी झिरवाळ यांना लाज…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

अक्षय कुमारला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक युजर्स त्याला, ‘या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन परत करणार का?’ अशा आशयाचे प्रश्न करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘तुमच्या माफीचा फायदा काय आहे सर, जाहिरात तर चालूच राहणार आहे. हिंमत असेल तर ही जाहिरात बंद करून त्यांचे पैसे त्यांना परत करा.’

अक्षय कुमारच्या माफीनाम्यानंतर एक युजरनं ट्वीट केलं, ‘तुम्ही हा करार मोडून त्या संबंधित ब्रँडला या जाहिरातीचं प्रसारण करणं बंद करायला का सांगत नाही. त्यानंतर तुम्हाला करार मोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईला तुम्ही घाबरता का?’

आणखी एका युजरनं लिहिलं, ‘अक्षय तुला खरंच या सर्व गोष्टींची खंत वाटत असेल तर तू संबंधित कंपनीकडून स्वीकारलेलं सर्व मानधन त्यांना परत करायला हवं आणि कायदेशीररित्या त्या कंपनीला जाहिरातीचं प्रसारण थांबवण्यास सांगावं. गोष्ट पैशांची नाही आहे तर तंबाखूचं उत्पादनांच्या जाहिराती थांबवणं गरजेचं आहे. तू मानधन परत कर आणि जाहिरात बंद करायला सांग.’

Story img Loader