मिलन लुथारीयाच्या २०११ साली आलेल्या ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले होते. असं असतानाही ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’च्या पुढील भागात सर्व नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. अक्षय कुमार, इमरान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची यावेळी चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे.
‘स्पेशल २६’ च्या यशानंतर भाव वधारलेल्या अक्षय कुमारने ब्रेक न घेता तो ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’च्या चित्रिकरणात व्यस्त झाला आहे. नुकताच तो सहअभिनेता इमरान खानसोबत चित्रिकरण करताना दिसला.
पहिल्या भागाला मिळालेले यश पाहता चित्रपटाचा पुढील कसा असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असताना, अक्षय आणि इमरानही आपल्या भूमिकेवर विशेष मेहनत घेत असल्याचं चित्रिकरणादरम्यान त्यांच्या अविर्भावावरून दिसले.
एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चरतर्फे याची निर्मिती केली जात असून हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा