सध्या कलाविश्वामध्ये ब्रेकअप आणि घटस्फोट यांच्याच चर्चा रंगल्या आहेत. या साऱ्यामध्ये अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीने गेल्या १५ वर्षांपेक्षाही अधिक काळ एकमेकांची साथ दिली आहे. विशेष म्हणजे जीवनात एकत्र चालणारी ही जोडी आता व्यावसायिकदृष्टीनेही एकमेकांची साथ देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षयकुमार हा अभिनेत्यासोबतच एक उत्तम शेफ आहे. त्याच्यातील हे कलागुण त्याने जपलेदेखील आहेत. त्यातच आता तो त्याची शेफगिरी एका जाहिरातीमध्ये दाखविणार आहे. ‘अदानी विल्‍मरच्‍या फॉर्च्‍युन बिर्यानी क्‍लासिक बासमती राइस’च्या जाहिरातीमध्ये तो कुकच्या रुपात दिसणार आहे. या जाहिरातीमध्ये त्याच्यासोबत पत्नी ट्विंकल खन्नादेखील झळकणार असून तो ट्विंकलसाठी बिर्याणी करताना दिसून येणार आहे.

दरम्यान, विल्‍मरच्‍या फॉर्च्‍युन बिर्यानी क्‍लासिक बासमती राइसच्या जाहिरातीचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं आहे. आमच्‍या किचनवर माझ्यापेक्षा अधिक अक्षयचे प्रभुत्‍व असते. त्‍याला स्वयंपका करायला आवडते आणि मला त्याने तयार केलेलं जेवण प्रचंड आवडतं,असं ट्विंकल यावेळी म्हणाली.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar is the king of twinkles kitchen
Show comments