अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘केसरी’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात बक्कळ कामाई केली आहे. जवळपास ७० कोटींहून अधिकचा गल्ला ४ दिवसांत या चित्रपटानं कमावला आहे.

धूलिवंदनला देशभरातील ३ हजार ६०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई या चित्रपटानं केली. तर चार दिवसांत ७८ कोटी या चित्रपटानं कमावले. मात्र आता आयपीएलला सुरुवात झाली आहे अशा वेळी चित्रपटाच्या कमाईला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी चित्रपटाची कमाई ही १८ कोटी होती तर रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ झालेली दिसून आली. रविवारी २१.५१ कोटींची कमाई ‘केसरी’नं केली आहे.

‘केसरी’ हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची कथा या ‘केसरी’मध्ये आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत केसरी’चा समावेश आहे. हा चित्रपट २०० कोटींहून अधिकची कमाई करेन असा अंदाज वर्तवला जात आहे.

२०१९ या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशी दमदार कमाई करणारे चित्रपट-
१. केसरी- २१.०६ कोटी रुपये
२. गली बॉय- १९.४० कोटी रुपये
३. टोटल धमाल- १६.५० कोटी रुपये
४. कॅप्टन मार्व्हल- १३.०१ कोटी रुपये

Story img Loader