सारागढी युद्धातील २१ रणवीरांची शौर्यगाथा सांगणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त गल्ला जमवला असून पहिल्याच दिवशी २१.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला हा प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘केसरी’ने रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’लाही मागे टाकलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईविषयीची माहिती दिली आहे. धुळवडीच्या दिवशी ‘केसरी’ प्रदर्शित झाला. सकाळी आणि संध्याकाळी मर्यादित शो असूनसुद्धा या चित्रपटाने बक्कळ कमाई केल्याचं तरण आदर्शने म्हटलंय. सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा हा अक्षय कुमारचा ‘गोल्ड’नंतर दुसरा चित्रपट ठरला आहे.

‘केसरी’ला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सारागढीच्या युद्धात शीख सैन्याने शौर्याचा अभूतपूर्व नमुना दाखवून दिला होता. १० हजार अफगाणी सैन्य सारागढीवर चालून गेले होते. २१ जणांनी १० हजार अफगाणी सैन्याच्या विरुद्ध दिलेला हा अभूतपूर्व लढा ठरला.

अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. अक्षयसोबतच या चित्रपटात परिणीती चोप्रासुद्धा झळकली आहे. परिणीतीची भूमिका थोड्या वेळासाठीच आहे. पण त्यातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

२०१९ या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशी दमदार कमाई करणारे चित्रपट-
१. केसरी- २१.५० कोटी रुपये
२. गली बॉय- १९.४० कोटी रुपये
३. टोटल धमाल- १६.५० कोटी रुपये
४. कॅप्टन मार्व्हल- १३.०१ कोटी रुपये

Story img Loader