बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसमवर चांगलं यश मिळालं असून प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली आहे. सगळीकडेच ‘सूर्यवंशी’ची चर्चा सुरु असताना अक्षयच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर या टीझरला तुफान पसंती मिळतेय.

‘पृथ्वीराज’ सिनेमा महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या सिनेमात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. यासोबतच सिनेमात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

राजकुमार राव आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, केव्हा आणि कुठे होणार लग्न ?

सिनेमाच्या टीझरवरूनच या सिनेमाची भव्यता लक्षात येतेय. टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेलं रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेत आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. येत्या नव्या वर्षात म्हणजेच २१ जानेवारी २०२२ ला सिनेमा रिलीज होणार आहे.


येत्या नव्या वर्षात अक्षय कुमार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ‘पृथ्वीराज’ सिनेमासोबतच तो ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘राम सेतु’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओ माय गॉड’ या सिनेमांमधून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader