अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर, प्रमोशन करण्याची पद्धत पाहता ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर कमाल करणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच घडलं नाही. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा देखील अपेक्षाभंग केला. आता तर ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो चक्क रद्द करण्यात आले आहेत. प्रेक्षकांनीच अक्षयच्या या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

आणखी वाचा – मराठीमध्ये आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा, नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर

ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रेक्षकच ‘सम्राट पृथ्वीराज’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये येत नसल्याने काही ठिकाणाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तिथपासूनच या चित्रपटाच्या सकाळाच्या शोला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. अखेरीस आता बरेच शो रद्द करण्याची वेळ या चित्रपटावर आली आहे.

अवाढव्य खर्च, भव्यदिव्य सेट, जबरदस्त प्रमोशन करुनही अक्षयच्या या चित्रपटाला जबरदस्त फटका बसला. अभिनेत्री मानुषी छिल्लरचा तर हा पहिलाच चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्याच दिवशी जवळपास फक्त ११ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. तर विकेण्डला देखील हा चित्रपट फारसा चालल नाही.

आणखी वाचा – नाना पाटेकर यांच्या लेकाचं साधं राहणीमान, कामातही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतोय मल्हार

‘सम्राट पृथ्वीराज’बरोबर अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर अजूनही हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ देखील उत्तम कमाई करणार असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही.

Story img Loader