बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एअरलिफ्ट’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार आणि निमरत कौर ही जोडी दिसणार आहे. अक्षय आणि चित्रपटातील अन्य कलाकार असलेले चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच प्रसिध्द करण्यात आले. कुवेतमधील एका व्यापाऱ्याची भूमिका साकारत असलेल्या अक्षयचा हा चित्रपट १९९० सालच्या आखाती युध्दावर आधारित असल्याचे बोलले जाते. या युध्दादरम्यान भारतीयांना कशाप्रकारच्या परिस्थितीतून कुवेतमधून बाहेर पडावे लागले आणि कोणत्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.
‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय आणि निमरतची जोडी
बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.
First published on: 24-02-2015 at 12:47 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar nimrat kaur will be together in airlift movie