बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एअरलिफ्ट’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार आणि निमरत कौर ही जोडी दिसणार आहे. अक्षय आणि चित्रपटातील अन्य कलाकार असलेले चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच प्रसिध्द करण्यात आले. कुवेतमधील एका व्यापाऱ्याची भूमिका साकारत असलेल्या अक्षयचा हा चित्रपट १९९० सालच्या आखाती युध्दावर आधारित असल्याचे बोलले जाते. या युध्दादरम्यान भारतीयांना कशाप्रकारच्या परिस्थितीतून कुवेतमधून बाहेर पडावे लागले आणि कोणत्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा