बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचे लाखो चाहते आहेत. नुकताच अक्षय अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत दिसला. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात आले आहे.
जाहिरातीच्या सुरूवातीला अजय आणि शाहरूख एका कारमधून जात असल्याचे दिसते. अजय कार चालवत असतो तर शाहरुख त्याच्या शेजारी बसलेला असतो. तेव्हा शाहरुख बोलतो, “चल बघुया हा नवीन खेळाडू कोण आहे?” त्यानंतर व्हिडिओमध्ये अक्षय येतो, जो तलवारीने ‘विमल इलायची’ पान मसालाचं पॅकेट कापतो. त्यानंतर अक्षय बोलतो, “बोलो जुबां केसरी.”
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहा अक्षयची ती जुनी मुलाखत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1815251088666785&id=100005457345835
शाहरुखनंतर आता अक्षय ही जाहिरात करू लागल्याने त्याच्या या निर्णयाच तीव्र निषेध केला जात आहे. सिगारेट सोडण्यास प्रोत्साहन देणारे अक्षय आता गुटख्याच्या ब्रँडची जाहिरात करतो हे चाहत्यांना आवडले नाही. इतकचं काय तर अक्षयचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : या फोटोत काय लिहिले आहे, तुम्ही ओळखू शकता का?
व्हायरल झालेल्या अक्षयचा हा व्हिडीओ २०१८चा आहे. या व्हिडीओत अक्षय बोलतो, “मला बऱ्याच मोठ्या मोठ्या गुटखा कंपन्यांच्या ऑफर येतात. पाहिजे ती रक्कम देण्यासाठी ते तयार असतात, पण प्रश्न त्याचा नाही आहे. स्वस्थ भारतसाठी मी हे चुकीचे काम करणार नाही.”