बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अक्षयने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२’ मध्ये न जाण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
अक्षयने नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयने इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ‘कान्स’ला जाण्याची संधी मिळाली पण कोव्हिडमुळे तो जाऊ शकला नाही. त्याचबरोबर भारतीय चित्रपटांच्या जागतिक स्तरावर पोहोचण्याचे श्रेय त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. “मला आयुष्यात पहिल्यांदाच कान्सचे आमंत्रण मिळाले. पण करोनामुळे मी जाऊ शकलो नाही. या उत्तराने पत्रकाराने विचारले की, एवढ्या मोठ्या अभिनेत्याला कान्समध्ये बोलावले नाही यावर विश्वास बसत नाही, यावर अक्षय म्हणाला की यात लाज वाटण्यासारखी काय बाब आहे, कदाचित मी कान्स चित्रपट महोत्सवाला जाण्याइतका चांगला कोणताही चित्रपट बनवला नसेल”, असे अक्षय म्हणाला.
आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं
आ
आणखी वाचा : “…यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!”; हेमांगी कवीने ‘केके’साठी शेअर केली खास पोस्ट
पुढे अक्षय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, म्हणाला भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात पंतप्रधान मोदींचे मोठे योगदान आहे. त्यांनी भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
अक्षय कुमारने केंद्रीय मंत्र्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जून रोजी गृहमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री हा चित्रपट पाहणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीही तिथे उपस्थित राहणार आहेत.