बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित रक्षाबंधन हा चित्रपट गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व सांगणारा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन हा सण ओळखला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अक्षय कुमारच्या कॅनडाचं नागरिकत्वावर विविध प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतंच त्याने यावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकांरापैकी एक आहे. त्याचा चाहता वर्गही फार मोठा आहे. मात्र तरीही भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे अक्षयला अनेकदा ट्रोल केले जाते. विशेष म्हणजे अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरुन त्याला कॅनडा कुमार असेही बोललं जातं. नुकतंच करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या कार्यक्रमात अक्षय कुमारने या सर्व ट्रोलिंगवर भाष्य केले. तसेच ‘लल्लन टॉप’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले? याबाबतचा खुलासाही केला आहे.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “चित्रपटाचा पूर्वार्ध हसवतो, पण नंतर…”

या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. माझे जवळपास १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यावेळी मला असे वाटलं की मी कुठेतरी दुसरीकडे काम करायला हवे. यानंतर मी माझ्या कॅनडामध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला. त्यावेळी त्याने मला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला. हल्ली बरेच लोक कामाच्या निमित्ताने कॅनडामध्ये येत आहेत आणि त्यातील बहुतांश भारतीय आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की माझे नशीब मला साथ देत नाही. त्यासाठी मला काही तरी करणं गरजेचे आहे. मी तिथे कॅनडामध्ये गेलो. नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले.”

“मात्र काही कालावधीनंतर माझं मत परिवर्तन झाले. त्यातच बॉलिवूडमधील माझे चित्रपट यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले होते. माझ्याकडे पासपोर्ट आहे. ज्याद्वारे आपण एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करु शकतो. मी एक भारतीय आहे. मी सर्व कर भरतो. मला तिथेही कर भरण्याचा पर्याय आहे. पण मी ते माझ्या देशासाठी करतो. बरेच लोक विविध गोष्टी बोलत असतात. पण मी भारतीय आहे आणि भारतीयचं राहणार”, असेही अक्षयने सांगितले.

चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाला “अक्षय कुमार आणि आमिर खान…”

त्यापुढे तो म्हणाला, “मी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार मला लवकरच भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. पण मला या गोष्टींचे दु:ख आहे की मी भारतीय असल्याचा मला पुन्हा पुन्हा दाखला द्यावा लागतो, हे फार वाईट आहे. “

दरम्यान अक्षय कुमारचा सूर्यवंशी सोडला तर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, आणि नुकताच आलेला रक्षाबंधन हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले आहेत. त्यातच अक्षय हा जॉली एलएलबीसह राम सेतू, बडे मियाँ छोटे मियाँ, ओह माय गॉड २ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमांना लोकं कसा प्रतिसाद देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.