बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा चित्रपट वादात भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाविरोधात अजमेरमध्ये तीव्र विरोध होत आहे. लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. यासोबतच लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रॅलीही काढली आहे. अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हा देखील लोकांनी त्याच्या लूकवर नाराजी व्यक्त केली होती.

अजमेरमध्ये ‘पृथ्वीराज’ चित्रपटाविरोधात गुर्जर समाजातील लोकांनी ही रॅली काढली आहे. मोठ्या संख्येने लोक जिल्हाधिकारींच्या कार्यालयात पोहोचले. लोकांनी रस्ता रोको करून निषेध केला आहे. पृथ्वीराज चौहान हे गुर्जर होते आणि राजपूत नव्हते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांसाठी एक निवेदन पत्र त्या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणीही केली.

हा चित्रपट आधी गुर्जर समाजाच्या नेत्यांना दाखवावा आणि त्यांनी या चित्रपटाला हिरवा कंदील दिला, तरच तो प्रदर्शित करावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचीही त्यांची मागणी आहे. गुर्जर समाजाचे अध्यक्ष हरचंद म्हणाले की, इतिहासाची न खेळता चित्रपट दाखवावा. जे सत्य आहे तेच चित्रपटात दाखवायला हवे.

आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…

पृथ्वीराज या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला आहे. अक्षय-मानुषीशिवाय संजय दत्त आणि सोनू सूदसारखे मोठे कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!

पृथ्वीराज हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोनाचे वाढते संक्रमण पाहता प्रदर्शणाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. कारण शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाची तारिख देखील पुढे ढकलण्यात आली आहे.