बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अक्षय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने देशातील इतिहास अभ्यासकांच्या अभ्यासावर-माहितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अक्षयने नुकतीच ‘एएनआय’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने भारतातील इतिहासाच्या अभ्यासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आपला इतिहास मांडतांना कोणती कमतरता राहिली याच काय कारण आहे?’ असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला होता. “आम्हाला शिकवलेल्या इतिहासात महाराणा प्रताप यांच्याबद्दल आणि पृथ्वीराज चौहान यांसारख्या आमच्या राजांविषयी फारच कमी सांगितले गेले आहे कारण ते लिहायला कोणी नाही. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात हे सगळं लिहिलेलं असायला हवं होतं. मी सुद्धा वाचलेलं नाही, तुमच्या मुलांनीही वाचलेलं नाही. शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करू इच्छितो. मी हात जोडून प्रार्थना करतो की यात बदल करण्याचा किंवा समतोल राखण्याचा प्रयत्न करा”, असे अक्षय म्हणाला.

आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

आणखी वाचा : “…तर सनासना चार मुस्काडात ठिवून देईन”, किरण मानें यांच्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप

पुढे समतोल राखण्याविषयी अक्षय म्हणाला, “आपण समतोल राखला पाहिजे. मी असं म्हणतं नाही की आपल्याला मुघलांबद्दल माहिती नसावी, तर आपल्या राजांचीही माहितीही आपल्याला असली पाहिजे. ते देखील महान होते आणि ही माहिती प्रत्येकासमोर आली पाहिजे. आपल्या मुलांना महाराणा प्रताप बद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.”

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

अक्षय कुमारने केंद्रीय मंत्र्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जून रोजी गृहमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री हा चित्रपट पाहणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीही तिथे उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader