पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. या प्रवासाचा पहिला मुक्काम जर्मनीतील बर्लिन येथे होता. पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते तिथे असलेल्या परदेशी भारतीयांना भेटतात. बर्लिनमध्येही त्यांनी भारतीयांची भेट घेतली. यावेळी एका मुलाने पंतप्रधान मोदींना देशभक्तीची कविता ऐकवली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ त्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

अक्षयने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींचा त्या लहान मुलासोबतचा व्हिडीओ शेअर करत अक्षय, म्हणाला “या मुलाचे देशावर असलेले प्रेम पाहून मन प्रसन्न झाले. नरेंद्र मोदीजी तुम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण दिला.” अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहत्यांच्या मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “वा राजसाहेब वा, बऱ्याच काळाने…”, राज ठाकरेंच्या भाषणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

दरम्यान, अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर प्रत्येक चित्रपटात अक्षयचा वेगळा लूक आणि त्यासोबत एक वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’, ‘रक्षा बंधन’ आणि ‘OMG 2’ हे चित्रपट आहेत. याशिवाय तो ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘सेल्फी’ सारख्या चित्रपटातही दिसणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच त्याचा बच्चन पांडे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Story img Loader